KaizenLinguistics

Foreign Language Academy Mumbai

Benefits of Learning a Foreign Language

Learning another language has many benefits, most of which are usually associated with its usefulness as a professional skill, such as finding a better job, earning more money, and ultimately a more successful future. It is no wonder that nowadays speaking more than one language is a filter used by employers during the hiring process, therefore, the more languages you know, the more marketable you become. Bilingual individuals are often claimed by their families or their employers to carry out functions that require a linguistic exchange or transaction with foreign people, and receive recognition and often times higher remuneration than those who don’t.

More employable


Statistics indicate over one third of businesses want to hire someone just for their language skills. And the fields that benefit are impressive as well.Doctors, game designers, marketing managers, and engineers all make the list of folks you wouldn't expect to increase their marketability by knowing a foreign language. As for travel guides, we just assume they bring language skills to the table, especially in international destinations.परदेशी भाषा शिकण्यातून करिअरचे अनेक नवे पर्याय तुमच्यासमोर खुले होतात. परकीय भाषेचं ज्ञान असल्याने नोकरीतही काही चांगल्या संधी उपलब्ध होऊ शकतात.

करिअरसाठी वेगळ्या किंवा नवीन क्षेत्राच्या शोधात असणा‍ऱ्या विद्यार्थ्यांसाठी परकीय भाषांचा अभ्यास हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. हा पर्याय नवीन नसला तरी करिअरसाठी नक्कीच चांगला आहे. आज आपली अर्थव्यवस्था सुधारत आहे. परदेशात जाऊन करिअर करणा‍ऱ्यांची संख्या वाढत आहे. अनेक परकीय संस्था, कंपन्या आपल्या देशात येत आहेत. अशा वेळेस तुमच्याकडे एखाद्या परकीय भाषेचं ज्ञान असेल, तर ते सोन्याहून पिवळंच म्हणावं लागेल. परकीय भाषेचं ज्ञान आणि त्या देशाची (परकीय) संस्कृतीची समज असणा‍ऱ्यांना आज कॉर्पोरेट क्षेत्रात खूप मागणी आहे.

परकीय भाषा अवगत असणा‍ऱ्या उमेदवारांना बहुराष्ट्रीय कंपन्या आणि बहुपक्षीय संस्था (मल्टिलॅटरल ऑर्गनायझेशन्स) यामध्ये करिअर करण्याची छान संधी मिळू शकते. मात्र, इथे काम करताना तुमच्याकडे उत्तम भाषा कौशल्य असायला हवं. कोणत्याही एका परकीय भाषेचं ज्ञान आणि इंग्रजी भाषेवरील पकड तुमची कारकीर्द घडवण्यासाठी उपयुक्त ठरू शकतं. मात्र, परकीय भाषा शिकणं अजिबात सोपं नाही. कोणतीही परकीय भाषा शिकताना जीवापाड मेहनत करावी लागते. सतत सराव केला, तरच तुम्ही या भाषेवर प्रभुत्व मिळवू शकता.

प्रशिक्षण :

शाळांपासूनच विद्यार्थ्यांना परकीय भाषा शिकता येईल. बारावीनंतर विविध इन्स्टिट्यूट, कॉलेज आणि युनिव्हर्सिटीमध्ये उपलब्ध असणा‍रे ग्रॅज्युएशन कोर्स करण्याचा पर्याय निवडता येईल.

याशिवाय, काही संस्थांमध्ये सर्टिफिकेट आणि डिप्लोमा कोर्सही उपलब्ध आहेत. हे कोर्स कमी कालावधीचे असतात. ज्या विद्यार्थ्यांना परकीय भाषेचं उच्च शिक्षण घेण्यात रस आहे, त्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशन आणि पीएचडीचा पर्याय निवडावा.

नोकरीच्या संधी :

परकीय भाषांचा अभ्यास केलेल्या उमेदवारांना त्यांच्यातील कौशल्य आणि अनुभवाच्या आधारे नोकरीच्या विविध संधी उपलब्ध होऊ शकतात.

- डिप्लोमॅटिक सर्व्हिस

- फॉरेन लँग्वेज ट्रेनर

- आंतरराष्ट्रीय आणि सरकारी संस्थांमध्ये अनुवादक/भाषांतरकार

- रिसर्च असोसिएट

- टुरिस्ट गाइड

- एअर होस्टेस किंवा फ्लाइट स्टुअर्ड

- फ्री लान्स रायटर, अनुवादक (ट्रान्सलेटर), इंटरप्र‌िटर

- पब्लिक रिलेशन ऑपिसर

परकीय भाषांवरील प्रभुत्वामुळे आपल्यासमोर अधिकाधिक चांगल्या नोकरीच्या संधी खुल्या होतात. टुरिझम, एम्बसीज, डिप्लोमॅटिक सर्व्हिसेस, मनोरंजन, पब्लिक रिलेशन्स आणि मास कम्युनिकेशन, आंतरराष्ट्रीय संस्था, पब्लिशिंग, इंटरप्र‌िटेशन आणि भाषांतर आदी अनेक क्षेत्रात तुम्ही करिअर करू शकता. याशिवाय, ऑनलाइन कॉण्टेन्ट रायटर्स, टेक्निकल ट्रान्सलेटर्स किंवा डीकोडर्स हे आणखी नवीन पर्याय काळानुरुप उदयाला आले आहेत. इथेही तुम्हाला चांगल्या संधी मिळू शकतात.

युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन (यूएनओ), फूड अँड अॅग्रिकल्चर ऑर्गनायझेशन (एपएओ) अशा आंतरराष्ट्रीय संस्था तसंच, भारतीय संस्था जसं की परराष्ट्र मंत्रालय, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, विदेश मंत्रालय आणि भारताचं गुप्तहेर खातं यामध्येही परकीय भाषा अवगत असणा‍ऱ्या उमेदवारांना मागणी आहे.